खूप वेळ ते कपाटाखालून बाहेरच आले नाही. मग हळूच डोकं बाहेर काढलं. बहुदा त्याला दूधाचा वास आला होता. ताटली समोरच होती. पण आतापर्यन्त आईचे दूध पित असल्याने त्याला ताटलीतले दूध कसे प्यायचे हे कळत नसणार..कारण त्याने त्याचा पायच दूधात टाकला. झालं! ओलं ओलं पायाला लागल्यावर ते घाबरून परत पळालं. पण या वेळी कपाटाखाली न जाता ते चुकून बाहेरच्या दिशेला गेलं. मी पडद्याच्या मागे उभी असल्याने त्याला
दिसत नव्हते. त्याची चुक त्याच्या लक्षात आली. पण पायाला लागलेलं दूध त्याला अस्वस्थ करत होतं. त्यामुळे ते बसलं आणि पुढच्या पायाचा जो पंजा दूधात बुडाला होता तो चाटायला लागलं. त्याला दूधाची चव बहुदा आवडली. सगळा पंजा चाटून झाल्यावर त्याने इकडेतिकडे बघून मी जवळपास नाही ना याची खात्री करून घेतली आणि परत दुधाच्या
ताटलीकडे गेलं. आता मात्र त्यात पाय न घालता जवळ जावून त्याचा आधी वास घेतला..मग स्वतःशीच बोलल्यासारखा ‘म्याव’ असा आवाज घशातून काढला आणि त्याच्या इवल्याश्या गुलाबी-गुलाबी जिभेने दूध पिऊ लागलं. थोडं दूध प्यायल्यावर त्याने पुन्हा कपाटाखाली धूम ठोकली.
मला खूप आनंद झाला. जे मगाशी प्रचंड गिल्ट फिलिंग आले होते ते जरा कमी झाले. त्याने दुधाला तोंड लावले नसते तर मला अतिशय वाईट वाटले असते.
आता पुढचा प्रश्न होता की त्या पिल्ल्याचे नाव काय ठेवायचे? माझ्या आजीकडे कित्येक वर्षे मांजरे होती पण त्यांची नावे वगैरे ठेवण्याचे लाड कुणी केले नव्हते. पण मला माझ्या मांजरांसाठी काहीतरी खास नाव हवं होतं.
ह्या पिल्लाचा रंग चॉकलेटी होता. तेव्हा चॉकलेट नाव ठेवावं असं मनात आलं. पण त्यात गोडवा नव्हता (म्हणजे नावात) …मग बराच विचार केल्यावर ‘चिकलेट’ हे नाव निश्चीत केलं. आणि मला तेव्हा असं वाटलं होतं की ती मांजर आहे.(काही दिवसांनंतर कळलं की तो बोका आहे!!!!)
अशा रितीने मी चिकलेट उर्फ चिक्याचे पालकत्व स्वीकारले!
आणि पालक या नात्याने सगळी जबाबदारी देखील स्वीकारली…पण हे त्याला कळायला हवे होते!
लगेच मी त्याला शहाणं करण्याचा चंग बांधला. म्हटलं त्याला त्याच्या नावाची ओळख झाली पाहिजे. म्हणून त्याला त्याच्या नावाने हाका मारायला सुरूवात केली. ते माझ्या भडिमाराला घाबरुन कपाटाच्या खाली एकदम मागच्या कोपर्यात जाऊन बसलं. तेव्हढ्यात आई-बाबा ऑफिसमधून आले. त्यांना माझा पराक्रम सांगितला…बसमधून मांजराचे पिल्लू घेऊन येण्याचा! दोघंही वैतागले. बाबा मला म्हणाले…अगं, ते पिल्लू तुझ्या हातुन निसटून कुठे गाडीखाली आले असते म्हणजे? खरंच मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता.
आई – बाबा दोघांनाही मांजरे आवडत होती पण आईला जरा काळजी वाटायची की आपण मांजर आणलं तर त्याचं सगळं आपल्या हातून नीट होईल ना? त्यामुळे तिचा जरा विरोध होता. बाबांना सगळ्यांची पिल्लं फार आवडायची…माणसांची देखील! नात्यातल्या, शेजार-पाजारच्या लहान मुलांचे बाबा खूप लाड करायचे. त्यामुळे बाबांचा काहीच विरोध नव्हता.
त्यांनी विचारले, आहे कुठे ते पिल्लू? मग मी कपाटाकडे बोट दाखवलं. बाबा चक्कं मांडी घालून कपाटासमोर बसले.
त्यांनी अगदी प्रेमाने चिकलेटला हाका मारायला आणि आपण तान्ह्या बाळांशी कसं ‘सोनुल्या-मोनुल्या, काय कलतो ले लबाड?’ असं लाडाने बोलतो तसं बोलायला सुरूवात केली. त्यांच्या या अशा बोलण्याचा चिकलेटला काय बोध झाला माहित नाही पण ते हळूच बाहेर आलं आणि बाबांकडे बघू लागलं…बाबांनी आपलं बोट दूधात बुडवून त्याच्या समोर धरलं. दूधाचा वास आल्याने चिकलेट त्यांच्याजवळ जाऊन बोट चाटू लागलं. माझ्या मनात अशी जळफळ झाली ना!
पण त्या इवल्याश्या जीवाला कोण जास्त मॅच्युअर्ड आहे ते एका मिनीटात कळलं!
हळूहळू चिकलेट आमच्या घरात रूळायला लागलं. घरातले सगळे कोपरे, अडचणीच्या जागा त्याच्या आवडत्या झाल्या. भूक लागली की आईकडे जायचं, खेळायला माझ्याकडे यायचं आणि लाड करून घ्यायला बाबांकडे जायचं हे त्याच्या लवकरच लक्षात आलं.
क्रमशः
पण त्या इवल्याश्या जीवाला कोण जास्त मॅच्युअर्ड आहे ते एका मिनीटात कळलं!
chhaan
By: Archana on जून 14, 2007
at 3:33 pm
masta….keep up the good work
By: Koham on जून 15, 2007
at 3:03 सकाळी
अर्चना, केवळ अप्रतीम!! किती सुंदर चित्रं उभं केलंस डोळ्यांपुढे!! मानलं… शिवाय, हे लेख ३-२-१ अशा उलट्या क्रमाने वाचत गेल्यामुळे तो फ़्लॅशबॅकचा परिणाम अतीशय नकळतपणे साधला गेला. You are a master at the art of image building through words! Kudos!!!
माझ्या वतीने एक काम करशील… मनीमाऊच्या त्या गोड पिल्लाचा एक पापा घे, आणि त्याला एक टेबलटेनिस चा चेंडू आणून दे…
म्हणतात, मुली परक्याचं धन, निघून जातात, दुर्दैवाने पाळीव प्राण्यांमध्ये ही शोकांतिका बोक्यांची आहे. तुझ्या चिक्याचा गोडवा, त्याचं तुझ्यावरचं आणि तुझ्या कुटुंबीयांवरचं प्रेम हे टिकून राहो, आणि तुमचं घर असंच आनंदी राहो!
सस्नेह,
योगेश
By: Yogesh Damle on जून 15, 2007
at 10:55 pm
अर्चना, कोहम आणि योगेश …धन्यवाद!
योगेश, तुम्ही लिहीलंय ते अगदी खरं आहे…चिक्या दोन वर्षाचा झाल्यावर एक दिवस आमचं घर सोडून कायमचा नाहीसा झाला. पण त्याचे अनेक मित्र- मैत्रिणी आमच्या घरी कित्येक वर्ष रहिले!
By: Ashwini Deosthalee on जून 17, 2007
at 4:57 सकाळी
एकदम झकास. मस्त ओघवती भाषा. अशीच लिहित रहा.
By: saathiya on जून 17, 2007
at 7:37 सकाळी
hi vaishakh,
faarch chhaan. He bahutek aajichyaa shivajiparkchya gharaatle varnana aahe. mala ekdum aaplya epidayascopechi aathvan aali. (tula athavtey kaa?) lihit raaha.
devnaagrimadhye kase lihites? malahi kalav. i can also upload some poems. Sudarshan is going to publish them in my memeory(???). But let me see them yaachi dehi yaachi dola.
giving a diff contact id here.
geeta.
By: geeta on जून 24, 2007
at 6:19 सकाळी
Yes…you are right geeta, I can not forget epidayascope!
By: Ashwini Deosthalee on जून 28, 2007
at 10:16 सकाळी
Hi Vaishali,
I dont know whether u still remember me or not. I m Geeta’s sister. Read ur blog, simply superb. Post next parts also, it’s very interesting. Keep writing.
Bye,
Vaishu
By: Vaishali on जुलै 8, 2007
at 5:04 सकाळी
अगं सेम ग! आमचं मांजर पण आणल्या आणल्या नवीन घराला सॉलिड घाबरलं होतं!!!!
सही वर्णन केलंय.
By: VJ on ऑगस्ट 3, 2007
at 4:15 सकाळी
Hi Varsha
Read your second article, it is like deja vu for me! Keep writing!
By: अंतर्नाद on ऑगस्ट 6, 2007
at 11:26 सकाळी