Posted by: अंतर्नाद | जानेवारी 17, 2008

उत्तरायण

तुझ्या शब्दांतली आश्वासनं

मनाला खूप उभारी देऊन गेली

आता कितीही वादळं आली…तरी

तू माझाच आहेस हे सांगून गेली 

कुठल्या जन्मीचे हे ऋणानुबंध

कुठल्या पुण्याची ही फलश्रुती

तू आणि मी भेटलो, तयार झाली

आयुष्यभराची अतूट नाती 

हा स्नेह असाच रहावा…नाही नाही

उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा

आयुष्याच्या उत्तरायणात

माझा प्रवास तुझ्या साथीने व्हावा


प्रतिसाद

  1. वा……..क्या बात है रे…….!! खूप छान आहे तुझं मनोगत :)

  2. khup khup chhan khup khup chhan


Leave a response

Your response:

प्रवर्ग