रविवार सकाळ

आठवड्यातील माझा सर्वात आवडता काळ म्हणजे रविवार सकाळ. शाळेत असताना रविवार हा उशिरा उठायचा हक्काचा दिवस. सकाळी जाग यायची ते आईने केलेल्या ब्रेकफास्टच्या मस्त वासाने. पोहे, उपमा, इडली सांबार…असा झकास मेनू असायचा. यावर ताव मारून झाला की पळायचे बाहेर खेळायला. सगळ्या मैत्रिणींबरोबर खेळ अगदी रंगात यायचा. दुपारी जेवायला आईने हाका मारेपर्यंत पोटात लागलेल्या भूकेचे भान नसायचे. 

कॉलेजात गेल्यावर रविवार सकाळ क्लास आणि NCC यातच जायची. कधीतरी जुहू बीचवर चक्कर असायची. नेहमी संध्याकाळी माणसांच्या गर्दीत हरवलेला हा समुद्रकिनारा सकाळी खूप आगळावेगळा, मोहक वाटायचा. 

लग्न झाल्यावर मी गिरगावात रहायला आले. मग रविवार सकाळचा कार्यक्रम ठरूनच गेला. पहाटे उठून मत्स्यालयापासून नरीमन पॉईंटपर्यंत चालत जायचे. सकाळचे समुद्राचे शांत रुप आपल्या मनालाही शांत करत असते. मग रमतगमत त्या विशाल रत्नाकराला डोळ्यात साठवत घरी परतायचे. घरी येताना रविवारचे ४-५ पेपर्स आणायचे. घरामागच्या बेकरीतून गरमगरम खारी बिस्कीटे आणायची, ३-४ कप मस्त आलं घालून चहा करायचा. आणि मग चहा,खारी, पेपर्स यांचा आस्वाद घेत रविवार सकाळ चवीचवीने enjoy करायची.

ठाण्याला रहायला आल्यावर समुद्र दुरावला, पण येऊरच्या जंगलाने साद घातली आणि नंतरच्या रविवारच्या सगळ्या सकाळी आपल्या नावें करून घेतल्या.

ऊन, पाऊस, थंडी… कशाकशाची तमा न बाळगता मी आणि बरेचदा माझा लेक किंवा आई यांच्या सोबत रविवारी पहाटे येऊर गाठले आहे.

ghar

i am thinking of my house in india….i am hundreds of kilometers away from my house…but virtually i visit my house everyday….

i like  to take feel of my house throughout the day!  mornings give freshness to the house…afternoons give little lazy touch…evenings give deserted look as  nobody is in the house…and at night when everybody comes together for dinner…my home becomes one of the family members…

 i like the surroundings…the mango tree, the crows sitting on the branches, the squirrels running all over its branches…the stray cats…the play ground and a small temple opposite the house….all together make my home complete…and yes….how can i forge…my family in the house…whom i am missing so much….

everytime i call up house…i ask some silly questions like how are the cats…has mango tree got its ‘mohor’…my son laughs at me….but then all that is part of me part of my house.

 last week mom told..she has redone one wall of bedroom as there was some problem….i want to see the new wall…

waiting to meet you…my sweet home…waiting to meet you