आजची संध्याकाळ

कितीतरी दिवसांनी या संध्याकाळच्या वेळी निवांत बसले आहे. काहीही न करता! गेल्या ६ महिन्यांत ज्या वेगाने घटना घडत गेल्या त्याचा नीट विचार करायला वेळच मिळाला नव्हता.

नोव्हेंबर २०१२ ते जानेवारी २०१३…खूप वाईट गेले. वैर्‍यावर देखील वेळ येऊ नये अशी आली. आईचे आजारपण आणि तिचे अचानक जाणे…सगळे काही अतर्क्य! अजूनही विश्वास बसत नाही की आई आता आपल्यात नाही.आईचे स्थान माझ्या आयुष्यात काय होते, हे फक्त मलाच ठाऊक आहे. ती नसण्याने किती एकटी झाले मी.

कोणी उरलं नाही. आता काही नाती आहेत, पण ती फक्त कर्तव्यापुरती. त्यात प्रेमाचा ओलावा नाही, मायेचा स्पर्श नाही. मला काय आवडते, काय नाही, याची पक्की ओळख केवळ तिलाच! मी न बोलताही माझ्या मनातले ओळखण्याची शक्ती केवळ तिच्यातच!

कधी कधी वाटते आपणच का? आपल्यावरच का असे प्रसंग यावेत? कितीतरी माणसं कसं मजेत आयुष्य जगत असतात. अगदी आखीव रेखीव. पुढच्या वीस – तीस वर्षांचे प्लॅन बनवतात आणि ते तसेच पार पडतात ही! आपण एखादी लहानशी गोष्ट करायची ठरवली, तरी नियती क्रूरपणे ऊधळून देते. का असं?

हे एकटेपणच आता आयुष्यभर सोबतीला. एकला चालो रे…या शब्दांचा आदर्श ठेऊनच  उरलेली वाटचाल करायची. सगळी नाती तपासून बघायची, त्यातली आपली सीमारेषा आखून घ्यायची. संदीप खरेची कविता आठवली, ‘एव्हढेच ना, एकटेच जगु!’ कुणावर खूप विसंबून रहायचं नाही. कुणावाचून काही अडवून घ्यायचं नाही. आपलं गाणं आपण गायचं! आपलं आयुष्य आपण जगायचं. काल पहिल्यांदा नाटकाला एकटीच गेले. आज कुठेही कामासाठी बाहेर जायचं नाकारून, संध्याकाळ आईला आठवत, तिच्या माझ्या चाललेल्या गप्पा आठवत…नुसतीच बसून होते.

9 thoughts on “आजची संध्याकाळ

 1. Sorry to hear about sad demise of your mother.. may god give eternal peace to her soul and a courage to accept the reality & to move on…………!
  the article is expressive .. i only suggest… ( as i have also lost both parents) find the similar relation from people. I am sure this is an irreparable loss. what have caused. but i am sure . when god closes one door he will open another. Believe in God& Believe in self. Take Care

  shrish Bhalerao

 2. हृदयाला भिडून गेले! मनुष्यप्राणी एकटाच असतो, पण मायेची माणसे त्याला एक परिसर मिळवून देतात. पण खरोखर असे बघ की आपली माणसे आपल्या हृदयातच तर जगतात. आणि ते स्थान कोणीच कधीच हिरावून घेऊ शकत नाही! हे जर ध्रुवाला कळले असते तर त्याला ताप करायची पण गरज नव्हती! आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेताना, आपली माणसे तर सततच आपल्याबरोबर असतात. शेवटी आपल्या स्मृती आणि आपले व्यक्तिमत्व वेगळे काढताच येत नाही कधी. हे मला मी जेव्हा अल्झायमरचे रुग्ण पाहिले तेव्हा आत पर्यंत जाणवले! काळात सगळ्या गोष्टी विसरण्याचे सामर्थ्य आहे, त्याचा आधार घेऊन पुन्हा उभे राहयचे आहे!! त्यासाठी शुभेच्छा, आणि माझी काहीही मदत होण्यासारखी असेल तर केव्हाही सांग…….

 3. अश्विनी……तुझं दु:ख कळतंय, पोचतंय…. !! ह्याच दु:खाला सामोरी गेलेय. थोडं जुनं असलं तरी फक्त खपली धरलीये पण आतून जखम अजूनही भळभळतीच आहे. थोडंसंही कारण पुरतं खपली निघायला 😦

  तू लिहिलेला शब्द न्‌ शब्द खराय. आई गेल्यावर किती भयंकर एकटेपण येतं हे अनुभवल्यावरच कळतं आणि अशी वेळ प्रत्येकावरच येते गं. आईच्या आठवणी, तिचं निरपेक्ष प्रेम, तिचं फक्त असणं ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व त्याची गरज प्रत्येकाला असतेच. आई गेल्यावर एकदम मोठ्ठं व्हावं लागतं ना गं 😦

  आता हळुहळु बाहेर यायलाच हवंय. महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्त होत रहा…..लिहीत रहा. त्याने खूप मोकळं वाटतं. काळजी घे.

 4. अश्विनिजी,

  मी फार आयुष्य फार पहिल नाही पण असं सत्य कधी समोर आलं नाही. मदत नक्कीच नाही कोणी करू शकत पण दुःख किती विराण असतं हे कळलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s