टागोरांची एक सुरेख प्रार्थना

एवढीच माझी इच्छा……!

 विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही

विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये….एवढीच माझी इच्छा !

दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे

तू सांत्वन करावस अशी माझी इच्छा नाही

दु:खावर विजय मिळवता यावा…एवढीच माझी इच्छा !

माझ्या मदतीला कोणी न आल्यास

माझं बळ मोडून पडू नये….एवढीच माझी इच्छा !

माझं तू रक्षण करावस, मला तारावंस, ही माझी प्रार्थना नाही,

तरून जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं …एवढीच माझी इच्छा !

माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्वन केलं नाहीस

तरी माझी तक्रार नाही

ते ओझं वाहायची शक्ती माझ्यात यावी…एचढीच माझी इच्छा !

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीन

दःखाच्या रात्री सारं जग जेव्हा मझी फसवणूक करील

तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये ….एवढीच माझी इच्छा!

 —– रवींद्रनाथ टागोर